esakal | खैरदऱ्यात हजारो ब्रास वाळूउपसा; चार तस्करांविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

खैरदऱ्यात हजारो ब्रास वाळूउपसा; चार तस्करांविरोधात गुन्हा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

संगमनेर (जि. नगर) : अवैध वाळूउपशामुळे संगमनेर तालुका सातत्याने चर्चेत असतो. त्यातही पठार भागातील खैरदरा परिसरातील मुळा नदीपात्र व कडेला असलेल्या शासकीय मालकीच्या जमिनीतून हजारो ब्रास मातीमिश्रित वाळूचा उपसा होतो. स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने, स्थानिकांनी याबाबत थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. (case has been registered against four smugglers for extracting thousands of brass sands)

राज्य गौण खनिज नियंत्रण पथक, नाशिक व नगर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने थेट कारवाई करून, चार वाळूतस्करांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी ः नांदूर खंदरमाळ (खैरदरा) शिवारात मुळा नदीवरील धरणांसाठी शासनाने जमीन संपादित केली होती. या ठिकाणी असलेल्या प्रचंड वाळूसाठ्यावर तस्करांनी डल्ला मारण्यास सुरवात केली. अनेक दिवसांपासून यांत्रिक साधनांनी व शेकडो वाहनांतून रात्रंदिवस वाळूचोरी सुरू आहे. यावर कारवाई होत नसल्याने, ग्रामस्थांनी थेट नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील व जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांच्या पथकाने सोमवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास खैरदरा येथे छापा घातला. त्यांच्या समवेत नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, मंडलाधिकारी किसन लोहारे, तलाठी केशव शिरोळे उपस्थित होते.

हेही वाचा: 'समृद्धी’साठी नगर जिल्ह्यात ८२५ हेक्टर क्षेत्राचे होणार भूसंपादन

कैलास मोरे, छबाजी मधे, वसंत मधे व राजेंद्र दुधवडे (सर्व रा. खैरदरा, नांदूर खंदरमाळ) यांनी शासकीय मालकीच्या जमिनीतून ३१० ब्रास वाळूचा अवैध उपसा केल्याने मंडलाधिकारी किसन लोहारे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राजेंद्र दुधवडे यांच्या मालकीचा हायवा (एमएच १४ ईएम. ६५४२) ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आर. ए. लांघे करीत आहेत.

(case has been registered against four smugglers for extracting thousands of brass sands)

हेही वाचा: निसर्गसौंदर्य लाभलेले, पण नरकयातना भोगणारे फोफसंडी

loading image
go to top