esakal | मंदिरातच करायचा चोरी, शेवटी देवाची काठी वाजलीच
sakal

बोलून बातमी शोधा

The police caught the thief stealing God's jewelry

पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना ही चोरी पथवे याने केल्याची खबर मिळाली. शोधासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले असता, तो पेमगिरी परिसरातील जंगलात लपल्याचे कळले. मुसळधार पावसामुळे त्याचा शोध घेण्यात अडथळे आले.

मंदिरातच करायचा चोरी, शेवटी देवाची काठी वाजलीच

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या वीरभद्र मंदिरातून देवाच्या चांदीच्या आभूषणांची चोरी केलेल्यास पोलिसांनी अटक केली. देवीची सुमारे चार लाख रुपये किमतीची आभूषणे परत मिळविली. 

पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह व अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांच्या उपस्थितीत ही आभूषणे देवस्थानाच्या विश्वस्तांना दाखविण्यात आली. त्यांनी ती ओळखली.

भास्कर खेमाजी पथवे (वय 42, रा. नांदूर दुमाला, ता. संगमनेर), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी चोरीचा तपास करण्यासाठी पथक तयार केले.

पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना ही चोरी पथवे याने केल्याची खबर मिळाली. शोधासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले असता, तो पेमगिरी परिसरातील जंगलात लपल्याचे कळले. मुसळधार पावसामुळे त्याचा शोध घेण्यात अडथळे आले.

अखेर काल (गुरुवारी) सकाळी त्याला जंगलातून ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीची कबुली देत, जंगलात लपवून ठेवलेली आभूषणे पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपी पथवे याच्याविरुद्ध पारनेर, संगमनेर व नाशिक रोड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. कोरठण (ता. पारनेर) येथील खंडोबा मंदिरातील चांदीच्या पादुकांच्या चोरीचीही कबुली त्याने दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर