
Shrirampur police crackdown: 7 pistols seized, 6 accused arrested after firing case.
Sakal
श्रीरामपूर : शहरातील शिवाजी रस्त्यावर गेल्या शुक्रवारी दुपारी उघड्या रस्त्यावर झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेनंतर शहरात आतापर्यंत सात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, सहा आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.