
अहिल्यानगर : शहर व जिल्ह्यात असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू आहे. यासंदर्भात आमची बैठक झाली असून, कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज दिली. या प्रश्नावर आमचे काम सुरू असून, लवकरच रिझल्ट दिसतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.