
पाथर्डी: तालुक्यातील मांडवा येथे सुरू असलेल्या बोंडडा इंजिनियरिंग लिमिटेड, हैदराबाद या कंपनीच्या सोलर प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईलसह इतर मुद्देमाल चोरून नेला, तसेच ट्रॅक्टर व काँक्रीट मिक्श्चरची तोडफोडही करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना पाथर्डी पोलिसांनी तत्काळ अटक केली. न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.