उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police custody to excise officers

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी

कोपरगाव - तालुक्यातील कोळपेवाडी येथील दारूविक्रेत्यांकडून ३५ हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. कोपरगावचे सहायक दुय्यम निरीक्षक राजेंद्र भास्कर कदम व सहायक दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते या दोघांना लाचप्रकरणी अटक झाली होती.

इतरांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणारे हे अधिकारी आता लाच घेताना पकडल्याने, त्यांनाच कोठडीत डांबण्यात आले. दारूविक्रीचा परवाना नसताना तो बिनबोभाट सुरू असतो. यामागे अधिकाऱ्यांची हप्तेखोरी असल्याचे समोर येत आहे. कोळपेवाडीच्या दारूविक्रेत्याने हप्तेखोर अधिकाऱ्यांना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकवून खळबळ उडवून दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार म्हणाले, की कोणत्याही शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोणीही लाच देऊ नये. लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हाच आहे. बेकायदा पैसे मागणाऱ्यांची तक्रार थेट लाचलुचपत विभागाकडे करावी. साधा फोन जरी केला तरी त्यांची तक्रार एका फोनवर घेतली जाईल. नागरिकांनी सतर्क राहून संपर्क साधावा. लाचेची जर कोणी मागणी केली, तर तत्काळ १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Police Custody To Excise Deparment Officers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..