श्रीरामपूरमधील ८१ बेपत्ता व्यक्ती पोलिसांनी शोधून काढल्या

गौरव साळुंके
Sunday, 3 January 2021

येथील शहर पोलिस पथकाने सर्वाधिक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला. विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचा विशेष सन्मान केला.

श्रीरामपूर ः बेपत्ता महिलांसह मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मागील डिसेंबर महिन्यात राज्यभरात ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहीम राबविले. वर्षभरात शहरासह तालुक्‍यातील विविध ठिकाणाहून 137 बेपत्ता व्यक्तींपैकी 81 व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

येथील शहर पोलिस पथकाने सर्वाधिक बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला. विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचा विशेष सन्मान केला.

गेल्या महिन्याभरात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज होती. शहर परिसरातून दहा बालके बेपत्ता झाल्याच्या तक्रारी येथील शहर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यातील चार बेपत्ता बालकांचा शोध पोलिसांनी घेतला. तसेच 137 व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी शहर पोलिसांकडे आल्या होत्या. त्यातील 81 बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांनी शोध घेतला.

78 बेपत्ता महिलांपैकी 52 आणि 59 बेपत्ता पुरुषांपैकी 29 पुरुषांचा तपास घेवून पोलिसांनी शोध लावला आहे. एक डिसेंबर ते 31 डिसेंबर अखेरपर्यंत 85 अपहरण झालेल्या बालकांसह बेपत्ता महीला आणि पुरुषांचा शोध घेतला. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police find 81 missing persons in Shrirampur