पोलिस लग्नमंडपात दिसताच आठशे वऱ्हाडींनी ठोकली धूम

लग्न सोहळा
लग्न सोहळा

राहुरी : नवरदेवाची मिरवणूक मंगल कार्यालयाच्या दारात आली. पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी ‘वधूला घेऊन यावे, मानकऱ्यांनी वरओवाळणी करावी,’ असा पुकारा केला. एवढ्यात महसूल व पोलिस खात्याचे पथक धडकले. सातशे-आठशे वऱ्हाडींची पळता भुई थोडी झाली.

राहुरी येथे रेल्वेस्थानक रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात एका लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याची माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना समजली. कोरोनाच्या निर्बंधांची पायमल्ली झाल्याने तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला. नायब तहसीलदार पूनम दंडिले, मंडलाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी रूपेश कारभारी, राधेश्याम मेहेर, महेश देशमुख, सचिन रणदिवे व पोलिस पथक लग्नस्थळी धावले. (Police fined the crowd for the wedding)

लग्न सोहळा
महसूल मंत्र्यांच्या कन्येने काढली पडळकरांची पात्रता

नवरदेवाची मिरवणूक रात्री साडेआठ वाजता मंगल कार्यालयाच्या दारात पोचली होती. अवघ्या काही सेकंदात तो बोहल्यावर चढणार होता. मात्र, मंडपाच्या दारात पोलिस व महसूल पथक दिसताच वऱ्हाडींची पळापळ सुरू झाली. शुभकार्यावर प्रशासनाचे संकट उभे ठाकले. लग्नापूर्वी कारवाई झाल्याने कोणतेही विवाह विधी झाले नव्हते. वधू-वर पक्षांनी विनंती करून, लग्नविधीला परवानगी घेतली. ४५ हजारांची दंडात्मक कारवाई करून महसूलचे पथक माघारी फिरले. वाहनासह सहा पोलिस विधी पूर्ण होईपर्यंत लग्नस्थळी थांबले. वधू-वरांच्या कुटुंबांतील मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत उर्वरित विधी उरकण्यात आले. लग्नासाठी आलेले सातशे-आठशे वऱ्हाडी परागंदा झाले. त्यांना वधू-वरांवर अक्षता टाकता नाही. आशीर्वाद राहिले बाजूला कारवाईलाच सामोरे जावे लागते की काय म्हणून त्यांनी मंडपातून धूम ठोकली. काही तर पोलिस पकडतील याच्या भीतीने धूम पळाले.

कणगर येथे लग्नसमारंभात वधू-वरांसह सुमारे चाळीस वऱ्हाडी कोरोनाबाधित आढळल्यामुळे तालुका प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

व्यंकटेश मंगल कार्यालयाचे मालक, तसेच वधू-वर पक्षांना प्रत्येकी पंधरा हजार याप्रमाणे पंचेचाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कार्यालय मालकाला समन्स बजावले. पुन्हा लग्नकार्यात गर्दी झाली तर मंगल कार्यालय ‘सील’ करण्यात येईल. (Police fined the crowd for the wedding)

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com