
काही चोरांनी कोल्हे यांच्या दिशेने विटा, तसेच दगडफेक केली. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या सुरक्षारक्षकावरही दगडफेक केली.
कोपरगाव (अहमदनगर) : येसगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वस्तीवर दगडफेक करीत, चंदनाचे झाड कापून चोरल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येसगाव येथील कोल्हे वस्तीवर 30 डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला होता. युवा नेते सुमित कोल्हे यांनी प्रसंगावधान राखत प्रतिहल्ला केल्याने चोरांना पळवून लावले होते. त्यावेळी काही चोरांनी कोल्हे यांच्या दिशेने विटा, तसेच दगडफेक केली. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या सुरक्षारक्षकावरही दगडफेक केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हा थरार सुरू असतानाच, कोल्हे यांनी सुरक्षारक्षकांना सोबत घेत आक्रमक पवित्रा घेत चोरांना पिटाळून लावले. तत्कालीन परिस्थिती पाहून सुरक्षारक्षक घनश्याम नेटके यांच्या फिर्यादीवरून चंदनचोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आज दरोड्याचे कलम वाढवून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.