जामखेडला हजर होताच पोलिस निरीक्षकांनी गुन्हेगारांना दाखवला हिसका

वसंत सानप
Saturday, 19 December 2020

जामखेडला नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून हजर झाल्यानंतर अशी धडाकेबाज कार्यवाही करणारे ते पहिलेच पोलीस निरीक्षक ठरले आहेत.

जामखेड : जामखेडला आठवडाभरापूर्वी नियमित पोलिस निरीक्षक म्हणून संभाजी गायकवाड हजर झाले. गायकवाड साहेबांनी पदभार स्वीकारला आणि त्याच रात्री जबरी चोरीचा गुन्हा घडला.

या गुन्ह्यातील आरोपी त्यांनी मुद्देमालासह गजाआड केले. एवढ्यावरच न थांबता अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीसांना गुंगारा देऊन फरार आसलेल्या सात वेगवेगळ्या गुन्ह्यातील सात आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले. 

हेही वाचा - जुन्या कांद्याची झाली घसरगुंडी

जामखेडला नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून हजर झाल्यानंतर अशी धडाकेबाज कार्यवाही करणारे ते पहिलेच पोलीस निरीक्षक ठरले आहेत.

या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले," गुन्हेगारांचा व  गुन्हेगारी प्रव्रत्तीचा बीमोड करण्यासाठी आपण काम करु;  पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक व जामखेड पोलीस स्टेशन यांनी सदरची मोहीम हाती घेतली आहे.

त्या दृष्टीने जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी नंदकिशोर खरात व दादासाहेब खरात (दोन्ही रा. हळगाव), बळीराम गणपत वाघमारे (रा. देवदैठण), एक महिला (रा. वाकी.),  महालिंग मोहीते (रा. पिंपळगाव आळवा), त्रिंबक गोपाळघरे,( रा मोहरी), मनोज बबन हळनोर (रा. मोहरी ता. जामखेड) अशा एकुण गंभीर गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी पकडण्याची कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, पोलिस कॉन्स्टेबल संजय लाटे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, आबासाहेब अवारे, संदीप राऊत, अरुण पवार ,संदीप आजबे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. तसेच या पुढेही अशीच कारवाई सुरूच रहाणार असल्याचे पोलीस निरीक्षक  गायकवाड यांनी  सांगितले.

गुन्हेगारांनी घेतली धास्ती

गुन्हेगारी प्रव्रत्ती, अवैद्य धंदे सावकारकी, विनापरवाना शस्र बाळगणाऱ्यांचा बिमोड करण्याचा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचा संकल्प पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी बांधला आहे. त्यांना साथ देण्यासाठी दोन पोलिस उपनिरीक्षक व एक सहाय्यक निरिक्षक रुजू झाले आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. पोलिसांचे मनोबल उंचावणार, गुन्हेगारांना खाकीचा धाक राहील, बनावट दारु, वाळू माफियांच्याही मुसक्या आवळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रोहित पवारांना धन्यवाद
जामखेडला तब्बल पंधरा दिवस नियमित पोलिस निरीक्षकपद नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षकांडे अतिरिक्त पदभार होता. त्यावेळी जामखेडकरांनी नियमित पोलिस निरीक्षकाची मागणी आमदार पवारांकडे केली होती. त्यांनी योग्य अधिकारी देऊ, अशी ग्वाही दिली होती. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हजर.होताच त्यांनी सुरू केलेल्या धडाकेबाज कार्यवाहीमुळे लोक आमदार रोहित पवारांना धन्यवाद देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Gaikwad initiated the operation in Jamkhed