पोलिसाकडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार | Ahmednagr cime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jail

पोलिसाकडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार

अहमदनगर : लग्नाच्या आमिषाने अत्याचार करणारा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आरोपी तुळशीराम वायकर यास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी तुळशीराम वायकर हे कार्यरत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. त्यानुसार आरोपी वायकर याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. त्यांच्या पथकाने वायकर याचा ठावठिकाणा शोधून त्यास अटक केली.

हेही वाचा: अहमदनगर : जबरी चोरी करणारे 24 तासांच्या आत जेरबंद

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarCrime NewsSakal
loading image
go to top