अहमदनगर : जबरी चोरी करणारे 24 तासांच्या आत जेरबंद | Crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Arrest

अहमदनगर : जबरी चोरी करणारे 24 तासांच्या आत जेरबंद

अहमदनगर : शहरातून पहाटे दुचाकीस्वारावर धारदार हत्याराने हल्ला (Attack) करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये अटक केली आहे. कोतवाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे. (Robbers arrested)

सतीश उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा. चितळे रस्ता, अहमदनगर) हे त्यांच्या दुचाकीवरून सोमवारी (ता.10) पहाटे जुन्या न्यायालयाजवळून जात होते. त्यांच्या पाठीमागून तीन अनोळखी आरोपी हे एका विना नंबरच्या गडद लाल रंगाच्या दुचाकीवरून आले. त्यांनी सतीश तरोटे यांना दुचाकीवरुन खालीपाडून धारदार हत्याराने दोन्ही हाताच्या पंजावर घाव घालत गंभीर जखमी केले. त्यांच्या गळ्यातील अंदाजे दहा तोळे वजनाची सोन्याचा गोफ बळजबरीने तोडला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: अहमदनगर : मराठ्यांच्या अन्नात माती कालवली

आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी

कोतवाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे आयुर्वेद चौक येथे गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह येणार आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने आयुर्वेद चौक येथे सापळा लावून आरोपी ऋषिकेश प्रदीप लड्डे (रा. सिव्हील हाडको, सावेडी), अक्षय ऊमाकांत थोरवे (रा. सागर हॉटेल शेजारी, पाईपलाईन रस्ता), यश किरण पवार (रा. सिव्हील हाडको, सावेडी) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून गुन्हा करताना वापरलेली लाल गडद रंगाची विना नंबरची दुचाकी व तिच्या डिक्कीत कत्ती (चाकू) हा मिळुन आल्याने जप्त करण्यात आली. तसेच या गुन्ह्यातील आरोपी गणेश ऊर्फ टिंग्या म्हसुदेव पोटे (रा. कानडे मळा, सारसनगर) यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे हे पुढील तपास करीत आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलिस निरिक्षक अनिल कटके, पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, राजेंद्र वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक संजय खंडागळे, बापू फोलाणे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, भीमराज खरसे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, प्रशांत बोरुडे, नितीन शिंदे, प्रशांत राठोड, चालक तागड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: अहमदनगर : तिसऱ्या लाटेच्या धास्तीने निर्बंध?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top