
संगमनेर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकासह हेडकॉन्स्टेबलला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता.१९) पहाटेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.