
Local Crime Branch raid: ₹37.33 lakh gambling material seized from Tirat-Bingo den.
sakal
खर्डा: खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिरट, बिंगो जुगार, तसेच दारुविक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ३७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ४० जणांविरोधात खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.