Parner News : वेठबिगारी ठेवलेल्या नऊ मजुरांची पोलिसांनी केली सुटका; दोन आरोपी ताब्यात

काम देतो असे सांगून काही मजुरांना आणले होते. त्यांना अर्ध पोटी ठेऊन किंवा अन्न पाणी न देता त्यांच्याकडून बळजबरीने गुरे चारण्याचे तसेच शेतातील कामे करून घेतले जात होती.
parner crime

parner crime

sakal

Updated on

पारनेर - कुरुंद (ता. पारनेर) येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून काम देतो असे सांगून काही मजुरांना आणले होते. त्यांना अर्ध पोटी ठेऊन किंवा अन्न पाणी न देता त्यांच्याकडून बळजबरीने गुरे चारण्याचे तसेच शेतातील कामे करून घेतले जात होती.

अशा नऊ वेठबिगारी म्हणून ठेवलेल्या मजुरांची पारनेर पोलिसांनी काल (ता. 17) सुटका केली. त्यानंतर दोघांना त्यांच्या नातेवाईकांच्या तर उर्वरित सात जणांना अहिल्यानगर येथील स्नेहालयात पाठवण्यात आले आहे. यात दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com