
कोपरगाव : परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव समृद्धी महामार्गावर कारवाई करत एका आयशर वाहनातून ६४ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी पानमसाला जप्त केला आहे. पोलिसांनी आयशरसह ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आरोपी अकिल रमजान शेख (रा. आदिलाबाद, तेलंगाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.