"आग लागली तेव्हा ICUमध्ये कर्मचारी नव्हते", सीसीटीव्ही फूटेज सापडलं

ahmednagar
ahmednagaresakal

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली, त्या क्षणी कामावर असलेले चार जण अनुपस्थित असल्याची महत्वाची माहिती समोर आली आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, अनुपस्थित असलेल्या चार जणांना अटक केल्याचं पाटील यांनी सांगितलं. आग लागली त्या वेळी प्रथम एक रुग्ण जीव वाचवण्यासाठी व्हेंटीलेटरचा मास्क काढून रांगत बाहेर येत होता, असे झधक्कादायक चित्र फुटेजमध्ये असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका रुग्णाच्या मुलाने वडिलांना आत जाऊन बाहेर काढल्याचंही सीसीटीव्हीतून उघडकीस आलंय.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या (ahmednagar hospital fire) अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना 6 नोव्हेंबरला घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली होती. जवळपास 17 जणांवर आयसीयूत उपचार सुरू होते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गतीन तपासाची चकत्र फिरवत चौकशी सुरू केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना आयसीयू वॉर्डमधील काही सीसीटीव्ही फूटेज सापडले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com