
अहिल्यानगर: जिल्ह्यात तीन हजार सार्वजनिक गणेश मंडळे असून, २२१ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. उत्सव काळात मंडळांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. प्रत्येक मंडळावर स्वतंत्र पथकाद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तासाठी तीन हजार पोलिस तैनात राहणार आहेत, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.