
-मार्तंड बुचुडे
पारनेर : जिल्हापरीषद व पंचायत समितीची गट व गण रचना जाहीर होताच अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र अद्याप गट व गणांचे आरक्षण जाहीर होणे बाकी असल्याने अनेकांनी गट व गण रचना सोयीची झाली म्हणून सुटकेचा ऩिश्वास सोडला असतानाच इच्छूकांनी आल्याच प्रवर्गाचे आरक्षण आपल्याच प्रवर्गाचे निघावे या साठी देव पाण्यात ठेवले आहेत. रचना जाहीर होताच कार्यकर्त्यांची विविध सार्वजणिक व वैयक्तीक कार्यक्रमातील उपस्थीतीही वाढली आहे. उमेदवारी आपणासच मिळावी या साठी नेतेमंडळीकडे लॉबिंग तसेच गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. सोशल मिडीयावरही आपण केलेल्या कामांचे तसेच नेत्यांबरोबरचे व्हीडीओ व रील्स व्हायरल होत आहेत.