
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे: उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उद्या (ता.२९) श्रीगोंद्यात येत आहेत. त्यामुळे ते डिंभे ते माणिकडोह बोगदा, कुकडी कारखान्याचे ''एनसीडीसी''चे कर्ज त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदी मुद्द्यांवर काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.