
अकोले: अकोले शहराची भविष्यातील पन्नास हजार लोकसंख्या विचारात घेऊन अकोले शहरासाठी नगरोत्थान योजनेतून ८५ कोटींची थेट निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना साकारणार आहे. या विषयावर मासिक सभेत सत्ताधारी गटातच गदारोळ झाला. नगरपंचायतीने कर्ज काढू नये, असा सूर उमटत सत्ताधारी नगरसेवकांमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले.