पारनेर - सध्या अहिल्यानगर शहरातील पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. .राजकीय दबावामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी खोट्या बलात्कार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून, माजी मंत्री व शिवसेना उपनेते दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद व गंमभीर ठरले आहे. फिर्यादी व्यक्तीचा संबंध राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे ही खासदार लंके यांचे म्हणणे आहे..'विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱ्यांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून, लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे.'शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे जे कर्तव्य पोलीस दलावर आहे, त्याच संस्थेवर राजकीय दबावाखाली अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत आहे..खासदार लंके यांनी दोन्ही प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संपूर्ण तपशीलासह अहवाल गृह विभागास सादर करण्यात यावा, खोटे गुन्हे नोंदवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात यावी..भविष्यात कोणताही राजकीय दबाव न स्वीकारता, सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे, यासाठी स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.'पोलिस दल जर अन्यायकारक आणि पक्षीय भूमिका घेऊ लागले, तर नागरिकांच्या सुरक्षेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनतो,' या बाबत शासनाकडून तातडीने कारवाईची करावी अशी मागणीही खासदार नीलेश लंके यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.