
अहिल्यानगर: गचांडी, हमरीतुमरी, शिवीगाळ, हाणामारी... असं काहीही गुरुजींच्या सभेत घडलं नाही. शेड्यूल्ड बँक, नोकरभरती अशा विविध विषयांवर आक्रमक झालेल्या विरोधकांचा रुद्रावतार दिसला नाही. काही नेत्यांनी अनपेक्षितपणे सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका घेतल्याने सभेचा नूरच पालटला. परिणामी कोणतेही आकांडतांडव न झाल्याने सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करून घेतले.