
मुरकुटे आपले गुरु आहेत, असं म्हणत शिवसेनेने उमेदवारी दिल्याने अवघ्या 17 दिवसांतच खासदार झालो, अशी गुरुविषयी आदरयुक्त भावना खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली.
अहमदनगर : मुरकुटे आपले गुरु आहेत, असं म्हणत शिवसेनेने उमेदवारी दिल्याने अवघ्या 17 दिवसांतच खासदार झालो, अशी गुरुविषयी आदरयुक्त भावना खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली. मात्र ‘आपल्याला शिवसेना पाऊली नाही. खासदार लोंखडे यांच्यावर शिवसेनेची आणि ठाकरेशाहीची कृपा आहे. त्यामुळे त्यांना सलग खासदार होता आले’, अशी खदखद काही काळ शिवसेनेत काढलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री सत्तार यांनाही पहिल्या प्रयत्नातच शिवसेना पाऊली आणि मातोश्रीने भरभरून दिले, असंही ते म्हणाले.
श्रीरामपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार मुरकुटे, मंत्री अब्दुल सत्तार आदी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते. यामुळे या कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. हा कार्यक्रम राजकीय नसला तरी यातून अनेक चर्चा रंगल्या आहेत. याच कार्यक्रमात दानवे आणि मंत्री सत्तार यांच्यातील टोपीबद्दलची राजकीय चर्चाही अख्ख्या महाराष्ट्रात रंगली होती. असाच अणखी एक चर्चा आहे ती म्हणजे खासदर लोखंडे आणि माजी आमदार मुरकुटे यांच्यातील एकमेकांच्या संवादाची.
हेही वाचा : दानवे चकवा देणारे, ते शब्दाला टिकणार नाहीत, डोक्यावर हात ठेऊन ते दानव बदतील
या कार्यक्रमात लोखंडे म्हणाले, ‘कर्जत- जामखेडमध्ये आपण वनमॅन- शो होतो. आता कळत नाही कोण कुठे आहेत आणि आपण कुणासोबत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आणि मुरकुटे यांच्या मार्गदर्शनामुळे राजकारणात यश मिळाले. माजी आमदार मुरकुटे आपले गुरु आहेत, असेही खासदार लोखंडे म्हणाले. सर्वजण म्हणतात खासदार लोंखडे यांचे सहकार्य लाभले. परंतू त्यासाठी आपण कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आणि मंजूर कामांची कल्पना देखील नसल्यामुळे सत्य झाकले जात नाही. परंतू खासदार म्हणुन आणि कार्यकर्ता म्हणुन सर्वसामान्यांसाठी मुरकुटे आणि विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करण्यास तत्पर असल्याचे खासदार लोंखडे यांनी स्पष्ट केले.
आपल्याला शिवसेना पाऊली नाही पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना शिवसेना पाऊली आणि त्यांना मातोश्रीने भरभरुन दिले. तसेच विखे पाटलांनाही शिवसेना पाऊली, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी उद्गार काढले. खासदार लोंखडे यांच्यावरही शिवसेनेची आणि ठाकरेशाहीची कृपा आहे. त्यांना सलग खासदार होता आले. राजकारणात टोपीला फार महत्व आहे. त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोपी काढु नये, असा सल्ला या कार्यक्रमात माजी आमदार मुरकुटे यांनी दिला.