राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात

अशोक मुरुमकर
Friday, 9 October 2020

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात’, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला.

अहमदनगर : ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात’, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला.

\‘शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण या सरकारनं कोकणाला काय दिलं? विदर्भाला केवळ १६ कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतंय तरी कुठे? असा सवाल भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्‌वारे केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार पवार यांनी “राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,” असं म्हणत ट्विट करुन टोला लगावला आहे,

राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” आमदार पवार यांनी केली.

फडणवीस यांचे ट्विट : कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार‘ झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पीकं उद्धवस्त झाली. पण शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही. ...आणि मुख्यमंत्री म्हणतात ‘पिकेल ते विकेल‘ : देवेंद्र फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political story of Leader of Opposition Devendra Fadnavis and MLA Rohit Pawar