

Shevgaon Civic Politics Sirojoddin Patel Becomes Vice President
Sakal
शेवगाव: शेवगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोजोद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी चार पक्षांकडून सहा अर्ज दाखल झाले होते. मात्र भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत वादानंतर पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने पटेल यांचा मार्ग मोकळा झाला व त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.