
कुकाणे (अहमदनगर) : कचरा उचलण्यासाठी घंटागाडी घरोघरी जाते, तरीही नेवासे-शेवगाव मुख्य रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्ते व चौकांत कचरा सर्रास पेटविला जातो. वायुप्रदूषण वाढले असून, श्वसनविकारांत वाढ होत आहे. कचरा जाळल्याने होणारे प्रदूषण, धूर व वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या कचऱ्याच्या राखेने कुकाणेकरांचा श्वास गुदमरला आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कुकाण्याची मुख्य बाजारपेठ नेवासे-शेवगाव रस्त्यावर वसली आहे. प्लास्टिक पिशव्या, कागद, पुठ्ठे, भंगारात आलेल्या तारा यांसह दिवसभरातील कचरा रस्त्यालगतचे काही व्यावसायिक रोज सायंकाळी किंवा रात्री दुकानासमोर रस्त्यावरच जाळतात. त्यामुळे रात्री कुकाण्यासह परिसर धुराने व्यापतो. यातून अनेकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. लहान मुले, वृद्ध, तसेच गर्भवतींचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. जाळून कचऱ्याची ज्या दुकानांसमोर विल्हेवाट लावली जाते, किंवा ज्या ठिकाणी राख दिसत असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
या आजारांना निमंत्रण !
जळालेल्या कचऱ्यातून विषारी वायू व धूर वातावरणात पसरतो. त्यामुळे कर्करोग, यकृताचे आजार, मेंदूविकार, अस्थमा होण्याची दाट शक्यता असते. फोम जाळल्याने निर्माण होणाऱ्या स्टायरीन वायूमुळे फुफ्फुसांसह त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे असा त्रास होतो. विशेषत: गर्भवती महिला, वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे कुकाण्यातील डॉ. कुलदीप पवार यांनी सांगितले.
घंटागाडी गल्लोगल्ली येऊनही त्यात न टाकता कचरा जाळण्याचे प्रकार होतात. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. त्या-त्या परिसरातील नागरिकांनीही जागरूक पणे हे थांबविले पाहिजे.
- राजेंद्र म्हस्के, ग्रामस्थ, कुकाणे'व्यावसायिक व नागरिकांनी कचरा साठवून तो घंटागाडीत टाकून सहकार्य करावे. घंटागाडीबाबत काही तक्रार असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
- सुभाष गर्जे, ग्रामविकास अधिकारी, कुकाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.