esakal | डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोरोनासह ‘हे’ आहे मोठे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

Pomegranate growers in Shrirampur taluka are facing difficulties due to climate change

ढगाळ हवामानामुळे व बाजारभावाच्या चढ- उतारामुळे शेती आणि शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो. कधी अस्मानी तर सुल्तानी संकटाचा सामाना शेतकऱ्यांना करावा लागतो.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोरोनासह ‘हे’ आहे मोठे संकट

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : ढगाळ हवामानामुळे व बाजारभावाच्या चढ- उतारामुळे शेती आणि शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो. कधी अस्मानी तर सुल्तानी संकटाचा सामाना शेतकऱ्यांना करावा लागतो. यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने सर्वदुर समाधानकारक पाऊल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर सदोष सोयाबीन बियानामुळे अनेकांवर दुबारपेरणीची वेळ आली. त्यावर मात करत असताना वाढत्या रोगराईने तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील कारेगाव, निमगावखैरी, गोंडेगाव, उक्कलगाव परिसरातील डाळिंब बागांवर ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे डाळिंब बागावर तेल्या, काळा टिपका, बुनकी, फळगळ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरवर्षी पेक्षा यंदा जुनमध्ये तालुक्यात झालेल्या अधिक पावसामुळे डाळिंब बागाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी महागडी औषधाची फवारणी करुन डाळिंबाच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक वर्षापासुन तेल्या रोग डाळिंब उत्पादकांचा पीछा सोडत नसल्याने बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बदलत्या हवामानामुळे वाढलेली रोग आटोक्यात ठेवण्यासाठी औषधांची फवारणी करून बागांची निगा राखावी लागते. महागडी औषधे खरेदी करून फवारणी करणे शेतकरयांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. डाळिंबाच्या उत्पादनासाठी एकरी सरासरी ९० हजार रुपये खर्च येतो. पुर्वमशागत, छाटणी, खते, औषधे, खुरपणी, बांधणी अशा विविध कामासाठी मोठा खर्च येतो. यंदा तालुक्यात अनेकांनी बागा राखल्या असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. परंतू मान्सूनपुर्व वादळी पावसाने अनेक बागाचे नुकसान झाले. 

वादळामुळे फळे घासल्याने काळे ठिपके पडले. फळांचा दर्जा घसरला. त्याचा फटका थेट डाळिंब विक्रीवर झाला आहे. डाळिंब उत्पादकांसाठी सोलापूर विभागातील केंद्रीय डाळिंब संशोधन संस्थेमार्फत नियमित मार्गदर्शन दिले जाते. तसेच हार्ट-स्पॅट योजनेद्वारे कृषी विभागाचे अधिकारी बागाची पहाणी व निरिक्षण करुन कृषीतज्ञ मार्गदर्शन करतात. तालुक्यात दोन वर्षापासुन डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढल्याने विमा मजुरीसाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांना भरपाई द्या
ढगाळ हवामानामुळे यंदा डाळिंब बागावर तेल्या रोगासह इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने कृषी विभागामार्फत नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा. तसेच विमा कंपनीने तात्काळ डाळिंब बागांचा विमा मजुर करुन शेतकर्यांना भरपाई द्यावी. अशी मागणी डाळिंब उत्पादक युवाशेतकरी सागर कदम यांनी केली आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image