Family Migration : भूस्खलनाची शक्यता; माळुंगीतील ४० कुटुंबांचे स्थलांतर

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे भूस्खलनाचा धोका वाढला आहे.
Malungi Village
Malungi Villagesakal

अकोले - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे तालुक्यातील म्हाळुंगी येथील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तशा नोटिसा देखील बजावल्या आहेत, तर माळीणसारखी घटना घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.

म्हाळुंगी गावातील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी एकूण ४० कुटुंब राहतात. डोंगराचा वरचा भाग हा भुसभुशीत झाला असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यावर व इथे काही घटना घडू शकते हे निदर्शनास आले. यानंतर ग्रामविकास अधिकारी ससाणे यांनी तातडीने अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. तसा लेखी अहवाल त्यांनी त्यांना दिला.

यानंतर तातडीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला याचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. तातडीने या विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे देखील या ठिकाणी आले. त्यांनीही या बाबतचा अहवाल तहसीलदारांना दिल्यानंतर येथील सोंगाळवाडीचे २९ कुटुंबे, तर अस्वलेवाडीचे ६, तर अन्य ६ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

यांना तात्पुरते येथील शाळा, सभामंडप येथे हलविण्यात येणार आहे. इथे जागा कमी पडल्यास ठाणगाव येथे हलविण्यात येणार आहे. माळीणसारखी घटना घडू नये काही अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून ते याबाबत लक्ष ठेवून आहेत.

या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या डोंगराचा सुळकाचा भाग कोसळू शकतो हे लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाले आहे. या चाळीस कुटुंबांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक आहेत. प्रशासनाने त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे डोंगराचे भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने डोंगरखाली असलेल्या वस्तीचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाळुंगी परिसरातच कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.

- सिद्धार्थ मोरे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com