अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

कोरोनातून बाहेर पडल्यानंतर रुग्णांमध्ये भीती, अस्वस्थता, अशक्तपणा, काम करण्यास निरुत्साह, थोड्याशा श्रमानेसुद्धा श्‍वास घ्यायला जास्त त्रास होणे, खोकला, भूक न लागणे, कामात लक्ष न लागणे, विसराळूपणा, झोप न येणे, रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गुठळ्या तयार होणे, यांसारखी लक्षणे कमी-जास्त स्वरूपात दिसून येतात.

नगर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन गेल्यानंतर उद्‌भवणाऱ्या आजारांवरील उपचारांसाठी येथील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले यांनी दिली. 

प्राचार्य डॉ. सुनील पवार म्हणाले, की अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेद्वारा चालवीत येणाऱ्या येथील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये यापूर्वीच कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे रुग्णांवर ऍलोपॅथी, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले जात आहेत.

कोरोनातून बाहेर पडल्यानंतर रुग्णांमध्ये भीती, अस्वस्थता, अशक्तपणा, काम करण्यास निरुत्साह, थोड्याशा श्रमानेसुद्धा श्‍वास घ्यायला जास्त त्रास होणे, खोकला, भूक न लागणे, कामात लक्ष न लागणे, विसराळूपणा, झोप न येणे, रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गुठळ्या तयार होणे, यांसारखी लक्षणे कमी-जास्त स्वरूपात दिसून येतात.

या सर्व लक्षणांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड केअर ओपीडी सुरू करण्यात येत आहे. याचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष भूषण चंगेडे, विलास सोनवणे, डॉ. डी. एस. पवार, लक्ष्मीनिवास सारडा, आर. एस. बोरा यांनी केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post Covid Care Center at Ahmednagar Homoeopathic Medical College