Postmaster beating : पोस्टमास्तरला मारहाण; नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Ahilyanagar Crime : अनिकेत राजेंद्र ठोंबे (रा. खांडके, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होते.
"Postmaster assaulted in Nagar Taluka, case filed at local police station for investigation."Sakal
अहिल्यानगर : कौडगाव (ता. नगर) पोस्ट ऑफिसमध्ये गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने पोस्ट मास्तरला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.