
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे : तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी सत्तेविरूद्ध लढण्याऐवजी सत्तेची वाट धरीत महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केले. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडी पूर्णपणे खिळखिळी झाली असून आघाडीकडे आश्वासक चेहरा राहिला नाही. दरम्यान, मातब्बर नेतेमंडळींनी आघाडीचा ‘हात’ सोडल्याने तिथे तरुण कार्यकर्त्यांना नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी आहे.