
राहुरी : उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जात आहेत, त्यांना चहाला सुद्धा बोलावू नये काय ? आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुणचार करणं, ही आपली मराठमोळी संस्कृती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कौटुंबीक चर्चेपलीकडे कोणतीही चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.