
अकोले : केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले. अटारी व वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय घेतले असले, तरी सरकारमध्ये पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छा शक्ती नाही, असे सांगतानाच पाकिस्तानविरुद्ध जलयुद्ध पुकारून सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे, तरी देखील भारत सरकार सिंधू जलवाटप करार रद्द केल्याबद्दल खोटं सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.