
राहुरी : वाहनाच्या धडकेने रस्त्यावर मूर्च्छितावस्थेत निश्चल पडलेल्या एका पक्षाला माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जीवनदान दिले. त्या पक्षाला रस्त्यावरून उचलून सुरक्षित स्थळी हलविले. त्याला पिण्यासाठी पाणी, खायला पेरू व भात दिला; परंतु पक्षाने तोंड लावले नाही. त्याचा फोटो काढून पक्षी तज्ज्ञांना पाठविला, तेंव्हा हा कापशी नावाचा शिकारी पक्षी असल्याचे समजले. ॉ