
कोपरगाव : अधिकारी होण्यासाठी इंग्रजी शाळेतच शिक्षण घ्यावे असे नाही. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी ही जिद्द, चिकाटी ठेवली तर राजपत्रित अधिकारी होऊ शकतात हे तालुक्यातील टाकळीची कन्या प्रतीक्षा बाळासाहेब देवकर हिने आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामधून प्रतीक्षाने महाराष्ट्रातून ४२, महिलांमधून १० वा क्रमांक मिळविला. प्रतीक्षा हिची सहायक कार्यकारी अभियंता (वर्ग एक राजपत्रित अधिकारी) पदावर निवड झाली. तिने मिळवलेल्या या यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.