राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

विद्यमान कुलगुरु अन्य राज्यातील असल्यामुळे सुरुवातीला त्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्यांनी खास मराठी स्पिकिंगचा कोचिंग क्‍लास सुरु केला होता. आता याउलट चित्र दिसत आहे, एका प्रबळ स्थानिक दावेदार उमेदवाराने मुलाखतीसाठी इंग्रजी स्पिकिंग क्‍लासेस लावले असल्याचे समजते. 

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा यांची पाच वर्षांची मुदत येत्या नोव्हेंबरमध्ये संपत आहे. अद्यापि राजभवनामधून नुतन कुलगुरु नियुक्तीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. तरीदेखिल इच्छुक उमेदवारांनी आपापल्या हालचाली सुरु केली आहे.

पात्र उमेदवारांचे आपापले बायोडाटा तयार आहेत, राजकीय मदतीसाठीदेखिल अनेकांनी चाचपणी सुरू केली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अनेक वर्षे निवड प्रक्रिया नसल्यामुळे राज्य शासनाच्या निकषानुसार पात्र उमेदवारांची संख्या कमी आहे. त्यामुळे या कुलगुरुपदासाठी असणारे निकषच बदलण्यासाठीही अनेकांनी फिल्डिंग लावली दिसून येते.

हेही वाचा - क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर येतेय वेबसिरीज

गेल्या काही वर्षांतील विद्यापीठाचे मानांकन घसरलेले दिसून आले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर कृषी विद्यापीठाचा कुलगुरु हा राज्यातील शेतीच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारा असावा. राज्य सरकार, केंद्र सरकार, कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्याशी योग्य समन्वय साधून विद्यापीठाची प्रगती करणारा असावा. तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक विभागाशी योग्य समन्वय साधून विद्यापीठाच्या हितासाठी कार्यमग्न असावा, अशी आग्रही मागणी विद्यापीठाच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

या कुलगुरूंनी मराठीचा क्लास लावला

राज्यातील सर्वोत्तम असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु या पदासाठी राज्यशासनाच्या पात्रतेनुसार पात्र, निष्कलंक, भ्रष्ट्राचाराचे आरोप नसलेला, शासकीय चौकशी सुरु नसलेला, न्यायप्रविष्ठ दावे नसलेला तसेच परराज्यातील नसलेला उमेदवार असावा अशी आशा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली.

या दावेदारांनी लावला इंग्लिश स्पिकिंगचा क्लास

विद्यमान कुलगुरु अन्य राज्यातील असल्यामुळे सुरुवातीला त्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्यांनी खास मराठी स्पिकिंगचा कोचिंग क्‍लास सुरु केला होता. आता याउलट चित्र दिसत आहे, एका प्रबळ स्थानिक दावेदार उमेदवाराने मुलाखतीसाठी इंग्रजी स्पिकिंग क्‍लासेस लावले असल्याचे समजते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation of aspirants for the post of Vice Chancellor of Rahuri Agricultural University