
अहमदनगर : तिसगावच्या पाण्यासाठी आराखडा तयार
तिसगाव : वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या तिसगावकरांना आता लवकरच हक्काचे पाणी मिळणार आहे. तिसगावच्या पाण्यासाठीचा स्वतंत्र आराखडा तयार झाला असल्याची माहिती गावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी दिली.मुळा धरण येथे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या योजनेवर शिक्कामोर्तब केले. राज्यमंत्री तनपुरे, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे उपअभियंता एस.के. गायकवाड, शाखा अभियंता जी.एच. निकम यांसह सरपंच काशिनाथ लवांडे संतोष आठरे ,राजेंद्र मस्के, अण्णासाहेब भापसे अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, भाऊ कोरडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांना १३३ बसद्वारे सेवा
लवांडे म्हणाले, की गेल्या ४० वर्षांपासून पाण्यासाठी लढा देत आहे पण आता मात्र राज्यमंत्री तनपुरे यांच्या सहकार्याने पांढरीपुल ते तिसगाव अशी स्वतंत्र पाइपद्वारे तिसगावला पाणी मिळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही पाईपलाईन पांढरी पूल, शिराळ मांडवामार्गे तिसगावला जाणार आहे. तिसगावच्या कार्यक्रमात सरपंच लवांडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पाणीप्रश्न उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने आज मुळा धरणावर मंत्री तनपुरे यांनी बैठक आयोजित केली होती.
या योजनेत कोणती गावे नव्याने समाविष्ट करण्यात येणार व कोणती गावे बाहेर पडणार याविषयी चर्चा झाली. पुढील पंधरा ते वीस वर्षांचा अंदाज घेउन हा अराखडा तयार केला आहे. कौडगाव, त्रिभुवनवाडी व निंबोडी या गावाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.यावेळी पाथर्डीच्या ३९ गावांना अतिवृष्टीचे कोणतेच अनुदान मिळाले नसल्याचे लवांडे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन अनुदान मिळण्याची ग्वाही दिली.
हेही वाचा: रुळाला तडा गेल्याने लोकल सेवा विस्कळीत! प्रवाशांना झाला विलंब
महाविद्यालयासाठी प्रयत्न
आज झालेल्या बैठकीत या भागात महाविद्यालय सुरू करण्यासाठी करंजी किंवा तिसगावला प्राधान्य देण्याची मागणी सरपंच लवांडे यांनी केली. याबाबत प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री तनपुरे यांनी दिले.
Web Title: Preparation Of Plan For Tisgaon Water Minister Prajkt Tanpure In Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..