esakal | अल्प मतात असतानाही बाजी मारत श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

President of Khadi gramodyog Association of Shrigonda taluka Balasaheb Nahata

खादी ग्रामोद्योग संघाच्या तालुकाध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक शुभम घाडगे, तर उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची निवड झाली.

अल्प मतात असतानाही बाजी मारत श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाची भेट

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : खादी ग्रामोद्योग संघाच्या तालुकाध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक शुभम घाडगे, तर उपाध्यक्षपदी रज्जाक शेख यांची निवड झाली. अल्पमतात असतानाही बाजी मारत कार्यकर्त्यांनी नाहाटा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट दिली. 

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या संघाच्या निवडणुकीत नाहाटा गटाला अकरापैकी अवघी एक जागा मिळाली होती. गेल्या महिन्यात संघाचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे व उपाध्यक्ष निवृत्ती कोकाटे यांनी राजीनामा दिला. या संधीचा नाहाटा यांनी फायदा उठविला. सत्ताधारी गटाचे ससाणे, बापू कसबे, विठ्ठल माने, शुभम घाडगे, रज्जाक शेख या सदस्यांनी नाहाटा गटात प्रवेश केला. अध्यक्षपदासाठी घाडगे यांना सहा, तर संध्या ससाणे यांना पाच मते मिळाली.

उपाध्यक्षपदाच्या लढतीत शेख यांना सहा, तर संजय शिंदे यांना पाच मते मिळाली. संघाच्या या राजकीय उलथापालथीमध्ये माजी अध्यक्ष भगवान गोरखे, रफिक इनामदार, सत्यवान शिंदे, आबासाहेब तोरडमल, कांतिलाल कोकाटे, संतोष गोरखे, सादिक शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संपादन : अशोक मुरुमकर