esakal | अंबालिका साखर कारखान्याने दिला एवढा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

The price given by the Ambalika Sugar Factory

अंबालिका कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसासाठी प्रतिटन 2250 रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला होता.

अंबालिका साखर कारखान्याने दिला एवढा भाव

sakal_logo
By
दत्ता उकिरडे

राशीन: कर्जत तालुक्यात अंबालिका नावाचा खासगी साखर कारखाना आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखाना म्हणून कायम तो चर्चेत असतो. मात्र, प्रथमपासूनच कारखान्याने ऊस उत्पादकांना उच्चांकी भाव देण्याचा प्रयत्न केला. यंदाही ती परंपरा कायम ठेवली आहे.

अंबालिका कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसासाठी प्रतिटन 2250 रुपयांप्रमाणे पहिला हप्ता देऊन, "एफआरपी'प्रमाणे निघणाऱ्या रकमेचा दुसरा हप्ता 350 रुपयांप्रमाणे उत्पादकांच्या खात्यांवर वर्ग केला.

हेही वाचा - नगरमध्ये कोरोनाचे ३०३ रूग्ण

"एफआरपी'ची रक्कम 2600 रुपये प्रतिटन याप्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केल्याने राशीनसह परिसरातील ऊसउत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

भांबोरा परिसरातील शेतकऱ्यांनी, चांगला दर दिल्याने कारखान्याचे आभार मानले आहेत. अंबालिका शुगरने ज्याप्रमाणे योग्य दर देऊन ऊसउत्पादकांना खूष केले आहे, त्याप्रमाणेच बारामती ऍग्रो या साखर कारखान्यानेही योग्य दर द्यावा, अशी मागणी भांबोरा परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

या भागातील बराचसा ऊस बारामती ऍग्रोला देण्यात आला होता. बारामती ऍग्रो हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित असल्याने, त्यांनी यामध्ये लक्ष घालून ऊसउत्पादकांच्या मागील गळीत हंगामातील उसाला योग्य दर देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.