esakal | पारनेरमध्ये कांदा झाला लाल, मिळाला तीन हजारांचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

The price of onion at Parner is three thousand rupees

आता मात्र कांद्याचे बाजार हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. कारण सध्या इतर कोणतेच पीक शेतक-यांच्या हातात नाही.

पारनेरमध्ये कांदा झाला लाल, मिळाला तीन हजारांचा भाव

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः सद्या कांदा चांलगाच लाच होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दीड महिन्यानंतर तब्बल सहापटीने कांद्याच्या बाजार भावात वाढ झाली. काल (ता. 9 ) पारनेर बाजार समिती आवारात एक नंबर कांद्यास तब्बल तीन हजार रूपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला.
अद्यापही शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असल्याने कांदा उत्पदक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बाजार समितीच्या आवारात तब्बल सुमारे 13 हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. मोठ्या प्रमाणात कांदा आवक होऊनही चांगल्या प्रतीच्या प्रथम क्रमांकाच्या कांद्यास 30 रूपये प्रती किलोचा बाजारभाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत. 
अद्यापही तालुक्यातील शेतक-यांकडे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा शिल्लक आहे. तसेच सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडही सुरू आहे. त्यामुळे तेही शेतकरी समाधानी झाले आहेत. 

हेही वाचा - तलाठी भरतीला मिळाला ग्रीन सिग्नल

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बाजार समित्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार तब्बल अडीच महिने बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर बाजार समितीत कांद्याच्या जाहीर लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे बाजारभाव थेट पाच ते सात रूपये प्रतिकिलो इतके घसरले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्या मध्ये शेतक-यांचा लागवडीचा खर्चही वसुल होत नव्हता. 

आता मात्र कांद्याचे बाजार हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. कारण सध्या इतर कोणतेच पीक शेतक-यांच्या हातात नाही.
मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात बाजार भाव कमी झाले होते. त्या वेळी बाजार समित्या बंद होत्या. कांद्याचा मोठा ग्राहक हा हॉटेल व्यावसायीक आहे. हॉटेल बंद असल्याने हॉटेल व्यावसायीकांची मागणीही पुर्णपणे थांबली होती. त्या मुळे कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती.

कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो ती निर्यात सुद्धा मध्यंतरी बंद होती. त्यामुळे बाजारभाव एकदम कमी झाले होते. अाता सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे कांद्यास पुन्हा एकदा चांगले बाजार मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

पारनेर बाजार समितीमधील कांद्यास कर्नाटक व इतर राज्यातूनही व्यापा-यांची मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सध्या बाहेरील राज्यातील व्यापारीही कमी प्रमाणात कांदा मागणी करीत आहेत. लवकरच ही मागणी सुरळीत होऊन बाजारभाव अाणखी वाढतीलय शेतक-यांनी घाई करू नये. शेतात परस्पर कांदा विक्री करू नये. फसवणुक होण्याची शक्यता असते.
-प्रशांत गायकवाड, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top