
अहिल्यानगर : सैनिक सुरक्षा पंधरवड्याअंतर्गत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चांगली मोहीम हाती घेतली आहे. आजी, माजी सैनिकांच्या जिल्ह्यातील ३२ पोलिस ठाण्यांमध्ये सैनिक, अर्धसैनिकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.