
नगर : मोहरम मिरवणुकीसाठी ६४ इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश
अहमदनगर - शहरात ८ व ९ ऑगस्ट रोजी मोहरमच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. पोलिसांनी लक्ष ठेवण्यासाठी शहरातील ६४ इमारतींना प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
कत्तलची रात्र मिरवणूक ८ ऑगस्ट रोजी कोंड्यामामा चौक (मंगलगेट), डाळ मंडई, लालूशेठ मध्यान यांची इमारत, सरस्वती साडी (मंगलगेट), सुरतवाला बिल्डिंग (तेली खुंट), व्यापारी असोसिएशन बिल्डिंग, कापड बाजार बाबूशेठ बोरा यांची इमारत, शहाजी चौकातील नीतू ड्रेसेस, देडगावकर यांची इमारत, नवा मराठा प्रेस इमारत, साफल्य इमारत, बार्शीकर बिल्डिंग (अर्बन बँक चौक), हॉटेल अन्नपूर्णा (आझाद चौक), डॉ. देशपांडे हॉस्पिटल (पटवर्धन चौक), कोर्ट इमारत, यतिमखाना, देवकाते बिल्डिंग (पंचपीर चावडी), हिरा एजन्सी (जुना बाजार), बॉम्बे बेकरी, बुरूड गल्ली, धरती चौक, काका हलवाई बिल्डिंग (रामचंद्र खुंट), डॉ. धूत हॉस्पिटल (किंग्ज रस्ता), शकूर शेख यांची इमारत (ब्राह्मण कारंजा), तांगे गल्ली या इमारती तात्पुरत्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.
मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस (ता. ९) बँक ऑफ महाराष्ट्र (चौपाटी कारंजा), दर्पण बिल्डिंग (दिल्लीगेट), चंद्रलोक अपार्टमेंट दिल्लीगेट, हॉटेल पंजाबी तडका, व्यापारी असोसिएशन बिल्डिंग (अडते बाजार), पिंजार गल्ली, पारशाखुंट, ख्रिस्त गल्ली, बॉम्बे बेकरी, जुना कापड बाजार, पंचपीर चावडी, यतिमखाना, सबजेल चौक, कोर्ट इमारत, सांगळे गल्ली, चौपाटी कारंजा या भागातील प्रमुख इमारती तात्पुरत्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत.
Web Title: Prohibitory Order On 64 Buildings For Muharram Procession Nagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..