esakal | शैक्षणिक संस्थांचा प्रवेशासाठी 'हायटेक' प्रचार! आपल्याकडेच प्रवेश घेण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

education

शैक्षणिक संस्थांचा प्रवेशासाठी 'हायटेक' प्रचार!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आशिष निंबोरे : सकाळ वृत्तसेवा

मिरजगाव (जि.अहमदनगर) : कोरोनाच्या सावटाखाली मागील वर्षभरात शिक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर बदल पहावयास मिळाले. असाच एक बदल ग्रामीण भागातील शाळांच्या प्रवेश प्रक्रियेत झालेला दिसून येत आहे. (promotion-for-admission-to-educational-institutions-marathi-news)

सोशल मीडियाचा वापर करून आपल्याकडेच प्रवेश घेण्याचे आवाहन

जुलैचा पहिला आठवडा उजाडला तरीही अजून शाळा प्रवेशांचा लगबग सुरू आहे. अद्याप देखील अनेक शाळांमध्ये क्षमते एवढे प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी शाळांबाहेर पालकांची गर्दीच गर्दी हे चित्र नित्याचेच असायचे, परंतु, आता स्थिती बदलली आहे. पालक प्रत्यक्ष शाळेकडे न येता ऑनलाइन प्रवेशाचा मार्ग स्वीकारत आहेत. शिक्षण संस्था देखील पालकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ऑनलाइन फंडे वापरत आहेत. आपली शाळा इतरांपेक्षा कशी वेगळी व दर्जेदार आहे, हे दाखविण्यासाठी मोठ्या गावांबरोबरच लहान लहान खेड्यातही ऑनलाइन जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे प्रवेशाची प्रक्रिया लोकांपर्यंत पोचवली जात आहे. आपल्या संस्थेची वैशिष्ट्य सांगणारे संदेश सर्वच ग्रुपवर फिरताना दिसत आहेत. आपला पट वाढण्यासाठी मिळेल त्या माध्यमातून शाळांचा प्रचार सध्या जोरात सुरु आहेत. वाढलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्याकडून दिली जाणारी आश्वासने यांचा विचार करता पालकांना मात्र, आपले पाल्य कोणत्या संस्थेत टाकायचं याबाबत संभ्रम होत आहे.

प्राथमिक शाळांचीही प्रचारात उडी

सद्यःस्थतीला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी टाकलेली कात व शाळांमध्ये झालेली गुणात्मक प्रगतीचा दाखला देत 'हम भी किसी से कम नही' म्हणत सरकारी प्राथमिक शाळांतील शिक्षकांनीही या हायटेक प्रचारात उडी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत 'आपली शाळा आपल्यासाठी' असे म्हणत सरकारी प्राथमिक शाळांमध्येच प्रवेश घ्यावा असे भावनिक आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.

तिसऱ्या लाटेचा परिणाम

कोरोनाची तिसरी लाट ही प्रामुख्याने लहान मुलांसाठी घातक असल्याचे बोलले जात असल्याने पालक आपल्या पाल्यांना शहरातील शाळांकडे पाठविण्यास धजावत नाहीत. या कारणामुळे शहरी भागातील शाळांना आपला पट टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: शिर्डीसह गावांत लसीकरणाची गरज; मंदिर बंद, अर्थकारण ठप्प

हेही वाचा: हेलिकॉप्टरने आली लग्नाची वरात! वरासोबत डॉ. अमोल कोल्हेही

loading image