इंधन दरवाढीचा चूल पेटवून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुरीत केंद्र सरकारचा निषेध
NCP
NCPesakal

राहुरी : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (बुधवारी) राहुरी तहसील कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी चुलीवर भाकरी भाजत केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य डॉ. उषा तनपुरे यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, नगराध्यक्ष अनिल कासार, संतोष निकम, धनराज गाडे, प्रदीप सोडनर, धीरज पानसंबळ, डॉ. राजेंद्र बानकर, नवाज देशमुख, शहाजी ठाकूर, सूर्यकांत भुजाडी, सुनील अडसुरे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.उज्ज्वला गॅस योजनेचे आमिष दाखवून अनुदान बंद केले.

पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केल्याने महागाई गगनाला भिडली. शेतीमाल मातीमोलाने विकावा लागत आहे. रासायनिक खते, बियाणे, पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. शेतकरी व सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण राहिले नाही, असे घणाघाती आरोप यावेळी वक्त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन, इंधन दरवाढ कमी करावी, सामान्य जनतेला जीवन जगणे सुकर करावे, अशी मागणी केली. ॲड. राहुल शेटे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com