

Shrirampur Demands Justice: Thousands Rally Against Crime After Hotelier's Murder
sakal
श्रीरामपूर : हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. हत्येच्या निषेधार्थ सलग तीन दिवस कडकडीत बंद पाळल्यानंतर चौथ्या दिवशी श्रीरामपूर शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. व्यापारी व सर्वसामान्यांचे नुकसान टाळण्यासाठी बंद मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, गुन्हेगारी हद्दपार होईपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.