

“Manchar protest halts Pune-Nashik highway for 10 hours — stranded passengers and endless queues of vehicles.”
Sakal
पारगाव : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा बिबट्याने केलेला हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे- नाशिक महामार्गावरील तांबडेमळा- भोरवाडी (ता. आंबेगाव) येथील नंदी चौकात सोमवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.