esakal | नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची मोफत माहिती; हवामानतज्ज्ञ डख यांचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Dakh will provide free weather guidance to farmers

उपग्रहचित्राचा अभ्यास यशस्वी ठरत असल्याने, पावसासह अन्य हवामानाचा अंदाज मला सांगता येतो.

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची मोफत माहिती; हवामानतज्ज्ञ डख यांचा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणतांबे (अहमदनगर) : "उपग्रहचित्राचा अभ्यास यशस्वी ठरत असल्याने, पावसासह अन्य हवामानाचा अंदाज मला सांगता येतो. राज्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव पावसाबाबतची माहिती देण्याचे काम मी सुरू केले आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांना हवामानाबाबतची माहिती घरबसल्या विनामूल्य दिली जाते. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी या महितीचा उपयोग करून घ्यावा,'' असे आवाहन परभणी, धामणगाव येथील हवामानतज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.

कामानिमित्त डख राहाता तालुक्‍यात आले होते. या वेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे व शेतकऱ्यांनी शाल- श्रीफळ देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला. साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी प्रास्ताविकात डख यांच्या हवामान अभ्यासाबाबतची माहिती सांगितली.

डख म्हणाले, ""उपग्रहचित्राचा अभ्यास करण्याचा छंद सात वर्षांपूर्वी लागला. त्यातून पाऊस, थंडी, ऊन यांबाबत अचूक अंदाज करणे शक्‍य होत आहे. शेतकऱ्यांना याबाबतची माहिती कळावी, यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून, पावसाचा अंदाज दिला जातो. तो खरा ठरत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास बसला. आभाळ लाल होणे, चिमण्या अंघोळ करणे, विद्युत प्रकाशाच्या उपकरणांवर किडे जमा होणे, आकाशात विमानाचा आवाज, या नैसर्गिक बाबींवरून, पाऊस येणे अथवा न येणे, याबाबत अंदाज बांधण्यास मोठी मदत होते.''

या वेळी माजी सरपंच मुरलीधर थोरात, सर्जेराव जाधव, विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, दिगंबर तुरकणे, भाऊसाहेब केरे, नीलेश चव्हाण, संध्या थोरात आदी मान्यवर हजर होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top