सासऱ्याचा सुनेवर डोळा, तिने केला गाव गोळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

एका विवाहितेचा घरात फरशी पुसत होती.त्यावेळी तिचा सासरा वाकडी नजर ठेवून होता. त्याने संधी साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

संगमनेर ः  लॉकडाउनच्या काळात सर्व जग कोरोनापासून कसा बचाव करायचा याचा विचार करीत असताना संगमनेर तालुक्यातील अोझऱ खुर्द येथे अजब घटना घडली.

एका विवाहितेचा घरात फरशी पुसत होती.त्यावेळी तिचा सासरा वाकडी नजर ठेवून होता. त्याने संधी साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने घरच्या मंडळींना हा प्रकार सांगितल्यानंतर त्या सासऱ्याविरूद्ध िवनयभंगाची तक्रार देण्यात आली. 
संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे गुरुवारी ( ता. 21 ) ही घटना घडली.

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष-उपाध्यक्षांना जुगारवाल्यांचा पुळका

ही बाब घरी सांगितल्याने संबंधित सासरा-सासू व त्याच्या दुसऱ्या मुलाने तसेच जावेने मारहाण केली, असेही त्या विवाहितेचे म्हणणे आहे. या घटनेत पिडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र गहाळ झाले असल्याची तक्रार सुनेने दिली आहे. 

दुसरी फिर्याद दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे वडील सावत्र भावाचा ट्रॅक्टर नेला होता. तो परत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सात ते आठजणांनी संगनमताने गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करीत लाथा बुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. 

या बाबत आश्वी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले अाहेत. पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल संजय लाटे पुढील तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A quarrel between two families in Sangamner