
संगमनेर : प्रलंबित प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेणार असून, पाणीप्रश्न हाच आपला प्राधान्यक्रम आहे. नगरपालिका हद्दीतील प्रश्नांबाबतही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून, निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेवून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात आणि शहरात संघटना बांधणीचे काम सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.